Temples

Shree Saptashrungi Nivasini Devi Mandir

Shree Saptashrungi Nivasini Devi Mandir – Temple in Maharashtra

श्री सप्तशृंगी देवी ही भारतातील ५१ शक्तीपीठांमधील एकमेव आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे. महाराष्ट्रात शक्तीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापुरची महासरस्वती, माहुरची महाकाली आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी होय. परंतु आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी हेच होय. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन सप्तशृंगगडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप आणि हिच आदिमाया. १८ हातांची ही महिषासुरमर्दीनी, ही श्री महालक्ष्मी देवी, हीच महाकाली, महासरस्वती होय. ञिगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर हे समुद्रीसपाटी पासून ४५०० फूट उंच टेकडीवर वसलेले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला येत असतात.

Scroll to Top